‘डेटिंग अॅपवरची’ मैत्री ठरली महागात, तरुणाला सव्वा लाखांचा फसवणुकीचा फटका!
Marathinews24.com
पुणे – डेटींग अॅपवरून झालेली मैत्री तरूणाला १ लाख ३५ हजार रूपयांना पडली आहे. मैत्री करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गुरुवार पेठेत राहायला असून, डेटींग अॅपच्या माध्यमातून तरुणीशी मैत्रीचा मेसेज त्यांना पाठविला होता. संदेशातील क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला असता, तेव्हा चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी १ लाख ३५ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.