Breking News
Pune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदीPune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणारFake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडा

Latur Adarsh Campus Case : लातूरच्या आदर्श कॅम्पस प्रकरणात कठोर कारवाई करा-डॉ. नीलम गोऱ्हे

Latur Adarsh Campus Case : लातूरच्या आदर्श कॅम्पस प्रकरणात कठोर कारवाई करा-डॉ. नीलम गोऱ्हे

पीडितेचे संरक्षण व तीन दिवसांत कार्यवाही अहवाल देण्याबाबत निवेदन

marathinews24.com

लातूर – Latur Adarsh Campus Case : आदर्श शैक्षणिक कॅम्पसचे संस्थापक व प्राचार्य बशीर शेख यांच्याविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या आरोपावरून दाखल गुन्ह्याची गंभीर दखल विधान परिषद सदस्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासाठी तयार केलेल्या निवेदनात आरोपीचा तातडीने शोध घेऊन कायद्यानुसार अटक, सखोल तपास आणि पीडितेच्या संरक्षणाबाबत सूचना दिल्या आहेत.

अन २३ वर्षांच्या खेळाडूला चिमुरडीने उघडे पाडले – सविस्तर बातमी 

प्रसिद्ध वृत्तानुसार, २० सप्टेंबरच्या कथित घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कठोर कारवाईसाठी पालक, महिला व सामाजिक संघटनांनी ५ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या संस्थाप्रमुखाविरुद्ध असे आरोप होणे अत्यंत चिंताजनक आहे. कोणत्याही व्यक्तीचे पद, संस्थेचा प्रभाव अथवा बाह्य दबावामुळे तपासात विलंब होता कामा नये, अशी ठाम भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी मांडली आहे. (Latur Adarsh Campus Case) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष तपास करून सीसीटीव्ही चित्रण, शाळेतील नोंदी व डिजिटल पुरावे सुरक्षित करावेत. तक्रार दडपण्याचा किंवा पीडितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असल्यास संबंधितांवरही कारवाई करावी, असे निवेदनात नमूद आहे.

पीडितेची ओळख गोपनीय ठेवून समुपदेशन, कायदेशीर सहाय्य व आवश्यक संरक्षण द्यावे. तिच्या शिक्षणात अडथळा येऊ नये याची दक्षता घ्यावी. संस्थेतील पूर्वीच्या संभाव्य तक्रारींची पडताळणी आणि बालसुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे. आरोपीच्या अटकेची सद्यस्थिती, पीडितेच्या संरक्षणाचे उपाय व तपासातील प्रगती यांचा प्राथमिक कार्यवाही अहवाल तीन दिवसांत आपल्या कार्यालयास सादर करण्यास डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×