Breking News
Pune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढा

Maharashtra Voter List Revision : मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Voter List Revision

विशेष सघन पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

marathinews24.com

पुणे – Maharashtra Voter List Revision : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी – सविस्तर बातमी 

भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख निश्चित करून महाराष्ट्रासह १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण जाहीर केले आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. Maharashtra Voter List Revision प्राप्त दावे व हरकतींची नोटीस देणे, त्यांची तपासणी व निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

मतदार यादीतील नाव, तपशील किंवा अन्य नोंदींबाबत दुरुस्ती अथवा हरकत नोंदवायची असल्यास संबंधित मतदारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित प्रक्रियेनुसार कार्यवाही करावी. सुधारित कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×