Breking News
MPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीलाVishwajeet Kadam : आंबेडकरी विचार संपवण्याचा भाजपचा डाव – डॉ. विश्वजीत कदम

MPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिका

MPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिका

आंदोलनामुळे वाहतूक, शाळा-महाविद्यालये, आपत्कालीन सेवांवर परिणाम

marathinews24.com

पुणे – MPSC Protest : एमपीएससी आंदोलनासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी आणि रस्त्यांवरील आंदोलने थांबवावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एस. एम. जोशी पूल, टिळक चौक आणि शास्त्री रस्त्यावर (अहिल्या स्टडी सेंटर) येथे सुरू असलेल्या आंदोलनांमुळे वाहतूक कोंडीसह दैनंदिन व्यवस्था विस्कळीत होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवर बुधवारी ( दि.७) सकाळी सुनावणी होणार आहे.

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर – सविस्तर बातमी

पुण्यातील नागरिक अमित बाळू सुपेकर आणि सौरभ प्रभाकर विरकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकार, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि आंदोलकांसह पाच जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ऍड रमेश दुबे याचिकाकर्त्यांची बाजू मांडत आहेत. एमपीएससीच्या (MPSC Protest) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलनासाठी २५ सप्टेंबरला पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. पोलिसांनी २६ सप्टेंबरला काही अटींसह दोन ऑक्टोबरला एस. एम. जोशी पुलावर आंदोलनाला परवानगी दिली होती. मात्र, ३० सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर २५ प्रतिनिधींनी आंदोलन स्थगित केल्याचे पत्र पोलिसांना दिले होते.

तरीही तीन ठिकाणी आंदोलने सुरू झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. मुंबईतील आझाद मैदानाच्या धर्तीवर पुण्यात आंदोलनासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी न्यायालयाच्या नोटिशीला राज्य सरकारचे वकील उत्तर देतील आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×