Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Nagarkar Jewellers Lucky Draw : नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये विजेत्यांना इलेक्ट्रीक कार, दुचाकी व आयफोन

बाणेरच्या दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन; पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – मॉलमध्ये, पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या दुकानात आपणही ‘लकी ड्रॉ’चे कूपन भरतो आणि नंतर आपण ते विसरुनही जातो. पण काही दिवसांनी ध्यानीमनी नसताना कार किंवा दुचाकी जिंकल्याचा फोन आल्यावर होणारा आनंद स्वप्नवत असतो, तसेच दृश्य रविवारी एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये पाहायला मिळाले. आपल्याला कार, दुचाकी आणि आयफोन मिळाला, यावर काही क्षण त्यांचा विश्वासच बसेना; पण खात्री झाल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला.

दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा शेतकऱ्यांना आधार – सविस्तर बातमी

नगरकर ज्वेलर्सच्या तुळशीबाग, लक्ष्मी रोड, कोथरुड, ठाणे, बाणेर अशा पाचही दालनांमध्ये हा लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खरेदी करणाऱ्या आणि कूपन्स भरणाऱ्यांना यामध्ये सहभागी होता आले. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बाणेरच्या दालनात अतिशय पारदर्शकपणे या लकी ड्रॉचा निकाल लावण्यात आला. यामध्ये ठाणे, कोथरुड आणि बाणेरच्या दालनांमध्ये खरेदी करुन कूपन भरलेल्या ग्राहकांनी बाजी मारली.

यामध्ये पहिले बक्षीस टाटा टिआगो इलेक्ट्रीक कार डॉ. अर्चना पवार (ठाणे दालन) यांना, दुसरे बक्षीस इलेक्ट्रीक अक्सेस दुचाकी डॉ. आसावरी कानडे (कोथरुड दालन) यांना, तर तिसरे बक्षीस आयफोन १७ सोनाली बागडे (बाणेर दालन) यांना मिळाले. ही बक्षिसे जाहीर झाल्यानंतर संबंधित विजेत्यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. यावेळी नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर, स्वाती वल्लभ नगरकर, वासंती वसंत नगरकर, प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर, पूजा नगरकर कुलकर्णी, रोहन कुलकर्णी उपस्थित होते.

या ‘लकी ड्रॉ’बाबत बोलताना पुष्कर नगरकर म्हणाले, ‘लकी ड्रॉ’चे हे पहिलेच वर्ष होते; तरीही ग्राहकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दसरा दिवाळीआधी सोन्याचा दर जास्त होता; पण सणासुदीला त्यात घट झाल्याने खरेदीचे प्रमाण वाढले. ग्राहकांनी सोने, सोन्याचे दागिने तसेच चांदीचीही खरेदी केली. सणवार, लग्नसराई या निमित्ताने या काळात खरेदीचे प्रमाण वाढलेले असल्याने आम्ही आता लकी ड्रॉ जाहीर केला. वाढते प्रदूषण, इंधनाची वाढती किंमत याचा विचार करुन बक्षीस म्हणून इलेक्ट्रीक गाडी देण्याचा विचार केला. याशिवायही दालनात ठराविक रकमेची खरेदी करणाऱ्यांसाठी ‘स्पिन टू विन’ अशी खास ऑफर देण्यात आली होती, ज्यामध्ये ग्राहकांनी घड्याळ, डीनर सेट, पाण्याची बाटली यांसारखी विविध बक्षिसे जिंकली.

प्रसाद नगरकर म्हणाले, बाणेरचे शोरुम दोन महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आले. मात्र येथील ग्राहकांनी अनपेक्षित प्रतिसाद देत नगरकर ज्वेलर्सवर भरभरुन प्रेम केले आहे. राजवाडा कलेक्शन ही या दालनाची खासियत आहे. यामध्ये ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार दागिने डिझाईन करुन मिळणार आहेत. राजवाडा या विशेष संकल्पनेअंतर्गत एलिट क्लासचे दागिने घडवण्यात येतात, यात एक डिझाईन एकदाच घडवले जाते आणि ते एक्स्लुझिव्ह असते. हे राजवाडा दालन केवळ खरेदीसाठीच नाही तर पाहण्यासाठीही अतिशय आकर्षक अशी रचना असलेले आहे. येत्या काळात आपल्या विविध जिल्ह्यांमध्ये आणखी विस्तार करण्याचा विचार आहे.

विठ्ठलाची साथ आणि मुलं घेत असलेले कष्ट यामुळेच व्यवसाय चांगल्या रितीने वाढत असल्याची भावना स्वाती व वासंती नगरकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. सर्व दालनांतील व्यवस्थापक यावेळी आवर्जून उपस्थित होते. लीना गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×