Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pimpri Chinchwad RTO Action : प्रवासी वाहतुकीतून मालवाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई; २ लाख १५ हजारांचा दंड

Pimpri Chinchwad RTO Action

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम

marathinews24.com

पुणे – Pimpri Chinchwad RTO Action : पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमधून अनधिकृतपणे मालवाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करून एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

सक्षम माता, सशक्त किशोरी; रक्तक्षयमुक्त पुण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार – सविस्तर बातमी 

पोर्टर, ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ऑनलाइन आधारित सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमधून मालाची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ६६/१९२ नुसार परिवहन वाहनांना संबंधित परवाना घेणे आणि परवान्यात नमूद केलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. Pimpri Chinchwad RTO Action परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून वाहनांचा वापर केल्यास संबंधित वाहनमालक व चालकांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येते.

प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणी व परवाना घेतलेल्या वाहनांचा वापर केवळ परवान्यात नमूद केलेल्या उद्देशासाठीच करावा. प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या वाहनांचा अनधिकृतपणे मालवाहतुकीसाठी वापर करू नये. तसेच ऑनलाइन आधारित सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनीही संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची यापुढेही नियमित तपासणी करण्यात येणार असून, अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनमालक व चालकांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×