Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-९ ची जय्यत तयारी

१.१९ कोटी लस मात्रा उपलब्ध होणार

marathinews24.com

पुणे – राज्यात लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी-९ साठी पशुसंवर्धन विभागाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. मे अखेरपर्यंत राज्याला १ कोटी १९ लाख लस मात्रा उपलब्ध होणार असून, लसींच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे अशी माहिती आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

नोडल अधिकारी कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश – सविस्तर बातमी

लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्याने २० ‘वॉक-इन कोल्ड-रूम’ उभारण्यात आल्या असून, प्रत्येक शीतगृहात सुमारे ३ लाख लस मात्रा साठवण्याची क्षमता आहे. याशिवाय विद्यमान शीतगृहांचाही पूर्ण क्षमतेने वापर करण्यात येणार आहे.

आतापर्यंत लाळखुरकत लसीकरणाच्या ८ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून, प्रभावी लसीकरणामुळे राज्यात अलीकडील काळात रोगाचा उद्रेक आढळलेला नाही. सलग दोन वर्षे रोगप्रादुर्भाव न झाल्यास महाराष्ट्राला ‘लाळखुरकत रोगमुक्त’ दर्जा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे दुग्ध, मांस आणि अंडी यांसारख्या पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळू शकते.

जिल्हानिहाय लस साठवण क्षमता तपासून माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. तसेच ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी विभागाने तयारी सुरू केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×