गुन्हे शाखेच्या युनीट सातची कामगिरी
marathinews24.com
पुणे – Pune Bus Chain Theft : पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणार्या माय-लेकाला गुन्हे शाखेच्या युनीट सातने अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख १८ हजारांची सोन्याची चैन जप्त केली आहे. ही घटना ६ ऑक्टोबरला विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. रूक्मिणी शंकर जाधव वय ५० आणि नितीन शंकर जाधव (वय ३५ दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यात बारमध्ये आधी बील देण्याचा वाद, तरुणाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी
तक्रारदार जेष्ठ नागरिक ६ ऑक्टोबरला पीएमपीएल बसप्रवासात करीत होते. गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरुन नेली होती. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानुसार युनीट सातकडून तपास केला जात होता. त्यावेळी सहायक फौजदार राजू कदम, सागर दळे, नेहा तापकीर, समाधान पाटील यांना चोरट्यांनी माहिती मिळाली. पथकाने जाधव माय-लेकारा ताब्यात घेतले. Pune Bus Chain Theft त्यांच्याकडून सोन्याची चैन जप्त करुन दोघांना अटक केली. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी राजेंद्र मुळिक, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक राहूल कोळपे, भरत उर्कीडे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, अमोल ढोणे, सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.




















