Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Crime News : पुणे आरटीओ मेट्रो स्थानक परिसरात एकाला लुटले

Kasba Peth Crime News

चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मेट्रो स्थानक परिसरात दुचाकीस्वार तरुणाला तीक्ष्ण शस्त्राच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका दुचाकीस्वार तरुणाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर भागात राहायला आहे. १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण आरटीओ मेट्रो स्थानक परिसरातून निघाला होता. रस्त्याच्या कडेला तो थांबला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्याच्या खिशातील दोन मोबाइल असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×