Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Fraud Case News : महिलेची ५० लाखांची फसवणूक; व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Pune Fraud Case News

मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Fraud Case News : व्यवसायासाठी ५० लाख रुपये घेतल्यानंतर परत न करता फसवणूक केल्या प्रकरणी मार्केट यार्ड भागातील व्यापाऱ्यासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंद्रकांत केशरचंद बाठिया, रुपेश चंद्रकांत बाठिया (दोघे रा. वर्धमानपुरा सोसायटी, गंगाधाम रस्ता, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्करी अधिकारी वसाहतीतील घरातून २० लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४८ वर्षीय महिला गुलटेकडीतील सॅलिसबरी पार्क परिसरात राहायला आहेत. आरोपींशी त्यांचा परिचय होता. व्यवसायासाठी पैशांची गरज आहे, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी ५० लाख रुपये घेतले. आरोपींनी त्यांना पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. Pune Fraud Case News फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सुनीता नवले तपास करत आहेत.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

Pune Fraud Case News : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेसह दाेघांची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी वारजे आणि मुंढवा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वारजे भागातील एका महिलेची चार लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धेंडे तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने मुंढवा भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची नऊ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, मुंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×