मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Road Accident News : भरधाव मोटारीच्या धडकेत रिक्षा प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी चौकात घडली. अपघातात रिक्षा चालक जखमी झाला. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता अनिल साठे (वय ५१, रा. टँक रस्ता, शांतीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ईश्वर येदू वाघमारे (वय ६५, रा. टँक रस्ता, शांतीनगर, येरवडा) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर भागात घरफोडी;पावणेतीन लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर वाघमारे यांची मेहुणी संगीता साठे रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी सहाच्या सुमारास रिक्षातून कामावर निघाल्या होत्या. विश्रांतवाडीतील प्रादेशिक मनोरुग्णलय चौकात रिक्षाचालक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्नात असताना भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिली. मोटारीच्या धडकेत रिक्षा उलटून प्रवासी साठे गंभीर जखमी झाल्या. अपघातात रिक्षा चालकाला दुखापत झाली. (Pune Road Accident News) गंभीर जखमी झालेल्या साठे यांच्यासह रिक्षा चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
Pune Road Accident News कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दशरथ सहदेव प्रसाद असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत प्रसाद यांचे जावई सौरभ पंकज आवळे (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दशरथ प्रसाद हे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एनआयबीएम रस्त्यावरुन निघाले होते. कोंढवा टपाल कार्यालयासमोरुन दुचाकीस्वार प्रसाद हे वळत होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार प्रसाद यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे तपास करत आहेत.






















