Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Timber Market Fire : पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात आग

५० ते ६० दुकानांना आग, वसाहतीतील घरांना झळ

marathinews24.com

पुणे – शहरातील भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरातील लाकूड साहित्याच्या दुकानांना मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. लाकूड साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आगीची झळ ५० ते ६० दुकानांना पोहोचली. अग्निशामक दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दोन तासांत आग आटोक्यात आली. आग लागल्यानंतर या भागातील वसाहतीत घबराट उडाली. वसाहतीतील नागरिक लहान मुलांसह धावत रस्त्यावर आल्याने घबराट उडाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. मात्र, आगीत टिंबर मार्केटमधील दुकानांचे मोठे नुकसान झाले.

परदेशात नोकरीच्या आमिषाने तरुणाची ४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

टिंबर मार्केट परिसरात फर्निचर साहित्य, तसेच प्लायवूड विक्रीची दुकाने आहेत. टिंबर मार्केट परिसरात विजय वल्लभ शाळेजवळ वसाहत आहेत. हा भाग दाटीवाटीचा असून, अरुंद गल्लीत फर्निचर, प्लायवूड साहित्याची दुकाने आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास टिंबर मार्केटमधील एका दुकानात आग लागली. दुकानातील फर्निचर, प्लायवूडने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आगीची झळ शेजारी असलेल्या दुकानांना पाेहोचली. लाकूड साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती भवानी पेठेतील मुख्य अग्निशामक केंद्रातील नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली.

टिंबर मार्केटपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मुख्य अ ग्निशामक केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंबर मार्केट परिसरात फर्निचर, प्लायवूड विक्रीची दुकाने असल्याने या घटनेची गांभीर्य ओळखून तातडीने पुणे अग्निशामनक दलाचे २४ बंब, पुणे कटक मंडळ अग्निशामक दलाचा एक बंब, पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण अग्निशामक दलाचे दोन बंब असे २७ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी गणेश सोनूने, उपमुख्य अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, राजेश जगताप, प्रमोद सोनवणे, कमलेश चैाधरी, कैलास शिंदे, नीलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १५० जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. टिंबर मार्केट परिसरातील वसाहतीत घरांना आगीची झळ पोहोचली. चारही बाजूंनी पाण्याचा मारा करुन दोन तासांत आग आटोक्यात आणली. घरे, तसेच दुकानांमध्ये कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी गणेश सोनूने, उपमुख्य अधिकारी विजय भिलारे यांनी दिली.

सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पोलीस, रुग्णवाहिका, महावितरण, स्थानिक नागरिक, पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.
महापौर नागपूरे यांची घटनास्थळी भेट महापौर मंजुषा नागपूरे, नगरसेवक अजय खेडेकर, गणेश कल्याणकर, महापालिकेचे सहायक आयुक्त गुरम यांनी घटनास्थळी भेट दिली. महापौर नागपूरे यांनी रहिवाशांची भेट घेतली. टिंबर मार्केट परिसरातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान तेथे तैनात होते. परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तेथे मदतकार्य केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×