Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी

राज्यस्तरावरील पदक विजेते व राष्ट्रीय स्पर्धा सहभागी खेळाडूंना प्राधान्य; बालेवाडी व दापोडी येथे होणार चाचणी

marathinews24.com

पुणे – राज्यातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत असून, त्यासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी दि. १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम – सविस्तर बातमी

या योजनेद्वारे क्रीडा प्रशिक्षण व्यवस्था बळकट करणे, पायाभूत सुविधा विकसित करणे, स्पर्धांचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार तसेच करिअर मार्गदर्शन यांसारख्या विविध घटकांचा समावेश करून सर्वांगीण क्रीडा विकास साधण्याचा उद्देश आहे. तसेच खेळाडूंच्या क्षमता वृद्धीसाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोगही घेतला जाणार आहे.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स, हॉकी, शुटींग व रोईंग या चार क्रीडा प्रकारांसाठी पुणे जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, २५ वर्षांखालील (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत) महाराष्ट्रातील खेळाडूंना अर्ज करता येणार आहे.

राज्यस्तरावर पदकप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर (SGFI, AITA, Khelo India National) सहभाग असलेल्या खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात येईल.
ॲथलेटिक्स, हॉकी व शुटींग या खेळांसाठी निवड चाचणी दि. १५ व १६ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी (वेटलिफ्टिंग हॉल), पुणे येथे होणार आहे. तर रोईंग या क्रीडा प्रकारासाठी चाचणी आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई., दापोडी येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

इच्छुक खेळाडूंनी dsopune6@gmail.com या ई-मेलवर अर्ज सादर करावा. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रे, त्यांची सत्यप्रती व तीन ओळखपत्र आकाराचे फोटो सोबत आणावेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. १३ एप्रिल २०२६ असून, अधिक माहितीसाठी श्री. सुरेश काकड (८८८८८०६१५८), श्रीमती मनीषा माळी (७३९१९६८१९२) व श्रीमती अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×