Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीतीने ज्येष्ठाची साडेआठ लाखांची फसवणूक

कॉलसेंटरच्या बहाण्याने ७१ लाखांची फसवणूक; दोघांना अटकगिफ्ट देण्याच्या बतावणीने महिलेला गंडा

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून कोथरूड भागाातील एका ज्येष्ठ नागरिकाची आठ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. गॅस देयक थकीत असून, पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवावे लागतील, अशी बतावणी चोरट्यांनी केली.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ही लिंक उघडताच चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा घेतला. मोबाइल क्रमांक ‘हॅक’ केला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात असल्याने चोरट्यांनी बँक खात्यातील आठ लाख ५१ हजार रुपयांची रोकड दुसऱ्या एका खात्यात जमा करुन घेतली. खात्यातून पैसे काढण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागात माॅडेल काॅलनीत राहणाऱ्या एका नागरिकाची सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केली होती. गॅस, वीज पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोेलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×