Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे-मोबाइलवरील गेम जिंकल्याने भेटवस्तू देण्यात येणार असल्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवासी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइलवरील गेम जिंकल्याने तुम्हाला महागड्या भेटवस्तू पाठविण्यात येणार आहेत. महागडा मोबाइल संच, चामड्याची पिशवी अशा भेटवस्तू पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी त्यांना भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले. तक्रारदार ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लोंढे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×