राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती उत्सवनिमित्त सारथी संस्थे मार्फत विविध उपक्रम राबवून जयंती साजरी
marathinews24.com
पुणे – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 151 व्या जयंती उत्सवनिमित्त 26 जून रोजी, सारथी संस्थे मार्फत विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
देशाला मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – सविस्तर बातमी
प्रा. मोरे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा होते. त्यांची नाळ ही जनतेशी जोडलेली होती. जनतेच्या रंजल्या गांजल्या कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटत राहिले. ते म्हणाले की, शाहू, फुले व आंबेडकर धर्मनिष्ठ होते पण त्यांनी इतर कुठल्याही धर्माचा अनादर केला नाही. शाहू महाराजां विषयी बोलताना ते म्हणाले की, सयाजीराव गायकवाड व शाहू महाराज हे दोन राजे सामाजिक कार्य करत असताना जेव्हा अस्वस्थ होत त्यावेळी ते तुकाराम महाराजांचे अभंग वाचत व यातून प्रेरणा घेत असत.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, सारथी संस्था शाहू महाराजांच्या विचारांनी कशी पुढे नेता येईल यादृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजीराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधन अधिकारी, श्रीमती मनिषा अहिरराव यांनी केले तर आभार उपव्यपस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी मानले.कार्यक्रमास सारथी संस्थेचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पासलकर, माजी व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, अनंत रायते, एमपीएससीचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सारथी अधिकारी व कर्मचारी तसेच पुण्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.