Breking News
Pune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकारSOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजन

UMED Maharashtra : दिवाळीनिमित्त उमेद स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांचे प्रदर्शनाचे आयोजन

एसजीएस मॉल आणि नवीन जिल्हा परिषदेत ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान प्रदर्शन

marathinews24.com

पुणे – उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे दिवाळी सणानिमित्त विशेष प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत एसजीएस मॉल, कॅम्प परिसर, पुणे येथे आणि 2 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अप्पर आयुक्त प्रांजल शिंदे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी आपल्या कौशल्यातून व मेहनतीतून तयार केलेल्या विविध दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळावा, महिलांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच त्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. प्रदर्शनामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव व नांदेड अशा 13 जिल्ह्यातील समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

पुणे व परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या सुगंधी व हर्बल साबण, अभ्यंग तेल, उटणे, नांदेडची शेवग्यापासून बनविलेली विविध उत्पादने तसेच लाडू, चकली, अनारसे इत्यादी दिवाळीच्या फराळासाठी लागणारी तयार पिठे, चिवडा, चकलीचे मसाले, कापडी पर्स व पाऊच, मुलांनी तयार केलेल्या किल्ल्यांवर ठेवण्यासाठी मातीचे मावळे, मातीची पर्यावरणपुरक भांडी, महाबळेश्वरचा प्रसिद्ध मध, सांगलीचे प्रसिद्ध बेदाणे, कोल्हापूर चंदगडचे काजू, हिंगोली व सांगलीची भौगोलिक मानांकन प्राप्त हळद, सोलापूरचा प्रसिद्ध मका चिवडा, शेंगा चटणी व कडक भाकरी, लातूरची हस्तनिर्मित गोधडी व कापडी खेळणी, जालन्याची प्रसिद्ध मेंढीच्या लोकरीपासूनची उत्पादने, धाराशिवमधील भूमचा खवा व पेढा आदी विविध उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×