Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

दैवी अवतार असल्याची बतावणी करुन महिलेवर अत्याचार

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

पुणे, वसईतील घटना, भोंदू पसार

marathinews24.com

पुणे – नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन एका भोंदूने महिलेवर अत्यचाार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून भोंदू पसार झाला. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून तरुणावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची समाज माध्यमातून तिची ओळख झाली. आरोपी वैद्य हा मूळचा वसईचा आहे. पीडित महिला व्रतवैकल्ये करायची, तसेच ती धार्मिक आहे. भोंदूने तिला जाळ्यात ओढले. माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो, अशी बतावणी त्याने महिलेकडे केली. त्यानंतर त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची भेट घेतली. मांजरी परिसरात तो तिला भेटला. त्यानंतर त्याने गुंगीचे ओैषद देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले. वसईतही तिच्यावर बलात्कार केला, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

भोंदूच्या शोधासाठी पोलिसांची पथके

भोंदू ऋषीकेश वैद्य हा पसार झाला असून, त्याचा वसई, तसेच पुणे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथके पसार आरोपीचा शोध घेत आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पाेलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांनी दिली. सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वसई पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर भागात असलेल्या मांजरी पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग केला.

पीडित महिलांनी तक्रार द्यावी

पीडीत महिलेने वसईतील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. भोंदू ऋषीकेश वैद्य याने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करुन त्याने महिलेवर अत्याचार केेले. अशा प्रकारची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×