Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून तरुणावर शस्त्राने वार

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

टोळक्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसर रेल्वे स्थानक परिसरात घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीतीने ज्येष्ठाची साडेआठ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

अक्षय आनंद गवळी (वय ३०, रा. कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. गवळीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गवळी हा रिक्षाचालक असून, त्याचा भाऊ अजिंक्य आनंद गवळी (वय २७, रा. शक्तीनगर, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी काशीराम मोघे (वय ३०), अभिषेक मोघे (वय २७), नंदू नवनाथ थोरात (वय २९, तिघे रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य गवळी हे रिक्षाचालक आहे. त्यांचा मोठा भाऊ अक्षय हा रिक्षाचालक आहे. श्रीरामनवमीनिमित्त अक्षय हा कात्रजहून मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आला होता. एका संघटनेकडून गुरुवारी (२६ मार्च) घोरपडी गाव परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कार्यकर्त्यांची छायाचित्रे, नावाचा वापर न करण्याचा ठरले होते. मिरवणुकीत काशीरामा मोघे याचा फलक लावण्यात आला होता. या कारणावरुन कार्यकर्त्यांच्या दोन गटात वाद झाला. अक्षयने मिरवणुकीत फलक लावण्यास विरोध केला होता.

त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी नंदू थोरात याने अक्षयला शिवीगाळ केली. तुला माज आला का ? अशी विचारणा केली. अक्षयला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्या वेळी मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करुन वाद सोडविला. मिरवणूक संपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास अक्षय आणि त्याचा मित्र अमित परदेशी हे मांजरीतील झेड काॅर्नर येथे निघाले होते. वेगवेगळ्या दुचाकीवरुन अक्षय, विनायक म्हेत्रे, म्हेत्रेचा कामगार, तसेच अक्षय आणि अमित हे निघाले होते. मुंढव्यातलील ताडीगुत्ता चौकात आरोपी काशीराम मोघे, नंदू थोरात यांनी अक्षयला पाहिले. आरोपींनी अक्षयला पुन्हा शिवीगाळ केली. हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील जाधव वस्तीत रात्री अकराच्या सुमारास अक्षयला आरोपींनी अडवले. आरोपींनी अक्षयवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला आरोपींनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पसार झालेल्या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×