Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

राष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या समन्वयकपदी पत्रकार देवेंद्र जैन यांची नियुक्ती

राष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या समन्वयकपदी पत्रकार देवेंद्र जैन यांची नियुक्ती

राष्ट्रीय पत्रकार महासंघकडून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी

marathinews24.com

नवी दिल्ली – गुन्हे विषयक बातम्यांचे वार्तांकन करणारे पुण्यातील वरिष्ठ पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पब्बित्र मोहन सामंतराय यांनी ही घोषणा केली.

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा – सविस्तर बातमी 

पत्रकार देवेंद्र जैन यांनी तीन दशकांहून अधिक काळ निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता केली आहे. गुन्हे विषयक पत्रकारितेमध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे. मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी पत्रकारिता सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी इंडिया टुडे, दूरदर्शन, यू एन आय वृत्त संस्था, दैनिक पुढारीत अनेक वर्ष काम केले. पुणे क्राइम पॅट्रॉल, पुणे डिफेन्स न्यूज, पी सी पी न्यूज एजन्सी येथे ते सध्या कार्यरत आहेत.

जैन यांच्यासोबत छत्तीसगडचे डी एस मिश्रा आणि रुणा शर्मा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पत्रकार महासंघ पत्रकारांच्या मुद्द्यांवर काम करत असून केंद्र व राज्य सरकारकडून त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जैन यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×