Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

१८ डिसेंबर अल्पसंख्याक दिन म्हणून केला जातो साजरा

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण – सविस्तर बातमी 

पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण हक्क मंचचे संस्थापक अध्यक्ष मतीनभाई मुजावर यांच्या माध्यमिक शिक्षण विभागातील उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांना एकत्र करून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत डॉ. अल्लामा इकबाल उर्दू प्राथमिक शाळा कासारवाडी, आला हजरत इमाम अहमद रजा उर्दू प्राथमिक शाळा नेहरूनगर, उर्दू प्राथमिक शाळा, खराळवाडी, जाधववाडी चिखली येथे तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा उरुळी कांचन, राजगुरुनगर, मंचर येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला

विद्यार्थ्यांमध्ये अल्पसंख्याक हक्क, समानता व सामाजिक सलोखा याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने शाळेत वकृत्त, निबंध व चित्रकला, भित्तीपत्र स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना चषक (ट्राफी) व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात चांदभाई बळबड्डी यांनी अल्पसंख्याक हक्क दिन आयोजित करण्यामागील उद्देश व अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत माहिती दिली. तसेच अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व, अल्पसंख्याकांचे हक्क व कर्तव्ये आदींबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शिक्षण हक्क मंचचे मतीनभाई मुजावर तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू विभागातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×