Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण

कुशल ड्रोन पायलट घडविण्यासाठी देण्यात येते प्रशिक्षण

marathinews24.com

पुणे – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था ही भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मान्यताप्राप्त संस्था असून, कुशल ड्रोन पायलट घडविण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामध्ये वर्ग प्रशिक्षण, सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष फ्लायिंग सत्रांचा समावेश आहे. संस्थेमार्फत लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (7 दिवस), मध्यम श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (7 दिवस) तसेच लघु व मध्यम श्रेणी संयुक्त रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (10 दिवस) उपलब्ध आहेत.

मराठा ना जरांगेंचा, ना बारामतीकरांचा; मराठा जातीवाचक नसून, फक्त मराठी भाषेचा – सविस्तर बातमी  

या कोर्ससाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे आहे. उमेदवारांकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी चार पासपोर्ट आकाराचे फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह), दहावीची मूळ गुणपत्रिका, प्रमाणपत्र, आधार कार्ड, एक अतिरिक्त ओळखपत्र (पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड), वरील सर्व कागदपत्रांच्या स्वयंघोषित प्रती तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे संपर्क साधावा. पात्र माजी सैनिकांनी दूरध्वनी क्रमांक +९१ ७५५०००३७०५ किंवा ई-मेल vnmkv.rpto@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×