Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

December 21, 2025

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

हडपसर परिसरात तरुणाचा खुनाचा प्रयत्न

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात […]

ताज्या घडामोडी

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे; अमोल पालेकर

रोटरी मराठी साहित्य संमेलनात चाहत्यांच्या प्रतिसादात रंगली मुलाखत marathinews24.com पुणे – भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात

गुन्हेगारी

शालेय विद्यार्थ्यांची वाढती क्रुरता थेट गळा चिरेपर्यंत…

राजगुरूनगरमधील घटनेने पालकांमध्ये चिंता marathinews24.com पुणे – शालेय विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणांमुळे वाढत्या क्रुरतेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×