हडपसर परिसरात तरुणाचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यासिन जब्बार शेख (वय २४, रा. एसआरए वसाहत, शिंदे वस्ती, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओंंकार झोंबाडे, तुषार काकडे, दाद्या बगाडे, शश्या उर्फ रोहन पिंगळे, किशोर काकडे, दिपू शर्मा, देव शिरोळे, मोन्या कुचेकर, कैलास काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेखने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात सराइताकडून पोलिसांवर गोळीबार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि त्याचे मित्र सोसायटीच्या पार्किंगमध्ये १९ डिसेंबर रोजी रात्री शेकोटी करुन थांबले होते. त्यावेळी आरोपी झोबाडे तेथे आला. ‘माझ्याकडे रागाने का बघतो ?’, अशी विचारणा करुन झोंबाडे आणि साथीदारांनी शेख याला शिवीगाळ केली. आरोपींनी शेख याला गज आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत शेख गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×