Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात सराइताकडून पोलिसांवर गोळीबार

पुण्यात सराइताकडून पोलिसांवर गोळीबार

पोलिसांच्या गोळीबारात सराइत जखमी

marathinews24.com

पुणे – सराइताने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नगर रस्ता भागात घडली. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात सराइत जखमी झाला आहे. ओंकार दिलीप भंडारे (वय २०, रा. चंदननगर) असे जखमी झालेल्या सराइताचे नाव आहे. त्याच्याविरुध्द चंदननगर पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनी लॉड्रींग केसच्या नावाखाली ऑनलाईन गंडा – सविस्तर बातमी 

सराईत भंडारे गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. तो नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात लपल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला शनिवारी (दि.२०) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मिळाली. त्यानंतर तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी तेथे सापळा लावला असता, झुडपात लपलेल्या भंडारेने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला.

पोलीस उपनिरीक्षक ढावरे यांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ढावरे यांनी झाडलेली गाेळी भंडारे याच्या डाव्या पायाच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेतील भंडारे याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती उपनिरीक्षक ढावरे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेंत कोणी पोलीस कर्मचारी जखमी झाले नाहीत, अशी माहिती चंदननगर पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×