मनी लॉड्रींग केसच्या नावाखाली ऑनलाईन गंडा

मनी लॉड्रींग केसच्या नावाखाली ऑनलाईन गंडा

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फोन करून पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला मनी लॉड्रींगच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यांचे बँक खाते तपासण्याच्या नावाखाली तब्बल १९ लाख ३० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात ७८ लाखांच्या सोन्याच्या लगडीवर कामगारांचा डल्ला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, २७ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. पोलीस असल्याची बतावणी करीत तुमच्याविरूद्ध मनी लॉड्रींगची केस दाखल असल्याचे सांगितले. बँकखाते तपासणीसाठी ऑनलाईनरित्या ताब्यात घ्यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडून बँकखात्याची माहिती घेउन ऑनलाईनरित्या १९ लाख ३० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.

परताव्याचे आमिष पडले २८ लाखांना

स्टॉकसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ३९ वर्षीय तरूणाला २७ लाख ८० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ११ एप्रिल ते ६ जून २०२५ कालावधीत धानोरीत घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संपत राउत तपास करीत आहेत.

गुंतवणूकीच्या नावाखाली १६ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला १६ लाख २१ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ कालावधीत वारजे माळवाडीत घडली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नीलेश बडख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×