पुण्यात ७८ लाखांच्या सोन्याच्या लगडीवर कामगारांचा डल्ला

पुण्यात ७८ लाखांच्या सोन्याच्या लगडीवर कामगारांचा डल्ला

रविवार पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – ज्वेलर्समध्ये काम करणार्‍या कामगारांनीच तब्बल ७८ लाख रूपयांची सोन्याची लगड चोरून नेली आहे. ही घटना १९ डिसेंबरला रविवार पेठेतील श्री बालाजी उत्सव इमारतीत घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराला माहिती झाल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार दोन कामगारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळसुत्र चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक – सविस्तर बातमी 

सुरज मधुसुदन समंता (वय २३, रा. मेदनीपूर, पश्चिम बंगाल) आणि गणेश बोलपाई गुच्छाईत (वय ३०, रा. हुगली, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी नितीन घार्गे (वय ३१ रा. रविवार पेठ, मूळ-गुरसाळे खटाव, सातारा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार घार्गे यांचा दागिने घडवण्याचा व्यवसाय असून, रविवार पेठेतील श्री बालाजी इमारतीत दुकान आहे. त्यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून आरोपी सुरज समंता आणि गणेश गुच्छाईत कामाला होते. घार्गेने १९ डिसेंबरला त्यांना २४ कॅरेट दागिने असलेली ७८ लाखांची सोन्याची लगड दागिने बनविण्यासाठी दिली होती. मात्र, मालकाची नजर चुकवून कामगारांनी लगड चोरून नेली. ते दोघेही दुकानात काम करताना दिसून आले नाहीत. त्यामुळे घार्गेने तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×