Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

मंगळसुत्र चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

मंगळसुत्र चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

२० लाखांचे दागिने जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागातील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणार्‍या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २०लाखांचे १६७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सुभाष चंद्रकांत जाधव (वय ३९ रा. शिरापुर धुमाळ, ता. शिरुर जि. बीड) आणि लहु संतराम गायकवाड (वय ३० रा. रायमोह ता. शिरुर जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हृदय शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा; डाॅक्टरविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

कोरेगाव भिमा येथे जयस्तंभास अभिवादनासाठी जाणार्‍या अनुयायींच्या सुरक्षिततेसाठी गुन्हे शाखेच्या युनीट सहाकडून पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यानुसार १८ डिसेंबरला एपीआय मदन कांबळे यांना मंगळसूत्र चोरणार्‍या टोळक्याची माहिती मिळाली. पथकाने दोघांना ताब्यात घेउन १६७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. चोरट्यांनी वाघोली, लोणीकंद, लोणी काळभोर, हडपसर, स्वारगेट परिसरातून महिलांचे दागिने हिसकावल्याचे उघडकीस आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, एपीआय मदन कांबळे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×