हृदय शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा; डाॅक्टरविरुद्ध गुन्हा

डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून केली बदनामी

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हृदय शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून एका प्रसिद्ध हदयरोग तज्ज्ञाविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डाॅ. रणजीत जगताप यांच्यासह सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय मधुकर जायभाये (वय ४४, रा. चिंचोली चैाक, बुलढाणा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डाॅ. जगताप यांच्यासह सहकाऱ्यांविरुद्ध शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. जगताप यांचे वानवडी भागात रुग्णालय आहे. विजय जायभाये यांची आई लिलावती (वय ६२) यांना १९ ऑक्टोबर रोजी हदयशस्त्रक्रियेसाठी (बायपास सर्जरी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियावेळी लिलावती यांचा मृत्यू झाला. डाॅ. जगताप आणि सहकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप जायभाये यांनी फिर्यादीत केला होता. याप्रकरणी पोलिसांकडून चैाकशी करण्यात आली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने याप्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×