Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

बसचालकासह दुचाकीस्वाराविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी बसचालकासह दुचाकीस्वाराविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंतेश्वर गोविंद सोनकांबळे (वय ५५, सध्या रा. साठे वस्ती, लोहगाव, मूळ रा. केरूर, ता. मुखेड, नांदेड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार नोहारसिंग धनुहार पेैकरा (वय ४८, रा. धानोरी, विश्रांतवाडी), बसचालक रुपेशकुमार रामदास यादव (वय ४८, रा. शिंदे वस्ती, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सोनकांबळे यांचा मुलगा दीपक (वय २५) याने विमानतळ पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरकोळ वादातून दोघांच्या खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतेश्वर सोनकांबळे हे १० डिसेंबर रोजी आरोपी नोहारसिंग याच्या दुचाकीवरुन विमाननगर भागातील ‘५०९’ चौकातून निघाले होते. चौकातून वळण घेण्यास मनाई असताना दुचाकीस्वार नोहारासिंग याने दुचाकी पेट्रोलसाठा चौकाकडे नेली. त्यावेळी खासगी बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अंतेश्वर हे जखमी झाले. नोहारसिंगने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही. त्यानंतर उपचारादरम्यान अंतेश्वर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याचे अंतेश्वर यांचा मुलगा दीपक याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गुंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×