किरकोळ वादातून दोघांच्या खुनाचा प्रयत्न

हडपसरमध्ये अल्पवयीनावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

चतु:शृंगी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना चतु:शृंगी परिसरातील जनवाडी आणि धानोरी भागात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी २३ डिसेंबरला – सविस्तर बातमी

लहानपणीचा मित्र बोलत नसल्याच्या कारणावरुन एकाने मित्रावर चाकूने वार केल्याची घटना जनवाडी भागात शुक्रवारी (१९ डिसेंबर) मध्यरात्री घडली. शिवा शिवशंकर सोनकांबळे (वय २५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी श्याम विटकर (वय २५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विटकर आणि सोनकांबळे हे लहानपणापासून मित्र आहेत. दोघांमध्ये वाद झाल्याने बोलत नव्हते. सोनकांबळे बाेलत नसल्याने विटकर आणि साथीदाराने शुक्रवारी मध्यरात्री जनवाडी भागात त्याच्यावर चाकूने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.

धानोरी भागात किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. सचिन युवराज पवार (वय २०, रा. एकतानगर, विश्रांतवाडी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आयुष दीपक गायकवाड (वय १९), स्वप्नील उर्फ अभिनव सुनील गवळी (वय १९, दोघे रा. भीमनगर, विश्रांतवाडी) यांच्यासह ६ अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत शाम राजकुमार जाधव (वय २५, रा. कृण्णा आंगण सोसायटी, धानोरी), ओंकार उल्हास कांबळे (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) जखमी झाले आहेत.

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरीतील आनंद पार्क परिसरात शुक्रवारी पहाटे आरोपी शेकोटी करुन गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी पाणी आणण्यावरुन आरोपी आणि फिर्यादी पवार, जाधव, कांबळे यांच्यात वाद झाला. या कारणावरुन आरोपींनी पवार, जाधव, कांबळे यांना शिवीगाळ केली. जाधव, कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×