शालेय विद्यार्थ्यांची वाढती क्रुरता थेट गळा चिरेपर्यंत…

राजगुरूनगरमधील घटनेने पालकांमध्ये चिंता

marathinews24.com

पुणे – शालेय विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणांमुळे वाढत्या क्रुरतेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाच्या रागातून वर्गातच मित्रावर थेट प्राणघातक हल्ल्याची राजगुरूनगरमधील घटना चिंतनीय आहे. अशा घटनांमुळे पालक-विद्यार्थ्यांमध्ये असलेला सुसंवाद कमी असणे, शालेय स्तरांवरील समुपदेशन कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भांडण, सोशल मीडियामुळे होणारे वाद, मित्र-मैत्रिणी, बॉयप्रâेड-गर्लप्रâेडची किनार, मुलासोबत कुटूंबाकडून न होणारी क्रुरतेला खतपाणी घालत आहे.

पुण्यात सराइताकडून पोलिसांवर गोळीबार – सविस्तर बातमी

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वैचारिक मानसिकतेत वेगाने बदल होत आहे. त्यामुळे भांडणावर वेळीच तोडगा काढणे, मध्यस्थी करणे, समन्वयाची भूमिका बजावण्यासाठी पालक, शालेय प्रशासनाने प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे. दरम्यान, जुन्या वादातून मित्रानेच दहावीच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये शालेय विद्यार्थ्यावर चाकूने गळा आणि पोटावर वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना १५ डिसेंबरला सकाळच्या सुमारास राजगुरूनगमध्ये घडली.

क्लासमध्येच रक्तरंजित थरार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुष्कर दिलीप शिंगाडे (वय १६, रा. सह्याद्री सोसायटी, वाडा रोड, राजगुरूनगर, ता. खेड) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षीय हल्लेखोर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडियाचा वाढता वापरही विद्यार्थ्यांच्या वागणूकीत मोठा घटक ठरत आहे. शालेय परिसरासह महाविद्यालयात खेळीमेळीत शिक्षण घेण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र, चित्रपट, मालिका, रिल्स, सोशल मीडियावरील अतिरंजक व्हिडिओंचा दुष्पपरिणाम विद्यार्थ्यांवर पडला आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. रस्ते प्रवास, एकटेपणाची भावना, शाळा परिसरात टवाळखोरांची दंडेलशाही, टवाळखोरांचे मित्र, टोमण्यांचा भडीमार असे दिव्य पार केल्यानंतरही अडचणींना सामोरे जावे लागते. पालकांकडून पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी बहुतांश घटनांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हल्लेखोरांचे धैर्य वाढून खूनापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. मात्र, अशा घटनांपुर्वी शालेय प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली जात नाही. सुरक्षिततेबाबत पोलिस प्रशासनाकडेही तक्रार केली जात नाही.

विशेषतः टवाळखोरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर घरापासून शाळेपर्यंत आणि परिसरात मुला-मुलीच्या सुरक्षितेबद्दल जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत शालेय प्रशासनाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यासोबत खासगी क्लास चालकांकडून नैतिकतेच्या आधारे जबाबदारी घेणे बंधनकारक आहे. मात्र, स्पर्धेच्या युगात अनेक खासगी संस्था, शालेय संस्था नियमांना तिलांजली देत आहेत. दुसरीकडे मात्र, फी वसूल करताना अनेक नियमांची कलमे वाचून पालकांना जबाबदारीची जाणीव केली जाते. त्याचपद्धतीने मुलांच्या सुरक्षिततेसाठी शालेय परिसरात सुरक्षारक्षक, सीसीटीव्हींचे जाळे, पालक मिटींगसह विविध कामांवर लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांकडून वेळोवळी पाल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलाचे मित्र, संगती, रोजचा दिनक्रम, यासंदर्भात आई-वडीलांची खबरदारी घेणे महत्वाचे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाला बळकटी देण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन अन संवाद आवश्यकच

शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन तरुणाईचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मुलांना मोबाइल दिल्यानंतर त्याचा वापर कोणत्या कारणासाठी होतेय, याची दक्षता पालकांकडून घेतली जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवू, याच इर्शेने मुलांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्याद्वारेही शाळेत आणि महाविद्यालयात वादविवाद यापुर्वी घडले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालकांसह शालेय संस्था, महाविद्यालय प्रशासन, पोलिस प्रशासनाने मुला-मुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. अन्यथा, वादावादी, मारामारी, अपघातांचे प्रमाण जैसे थे राहणार आहे.

शहरासह ग्रामीण भागात क्लासेसचे पेव; हाणामारीच्या घटना

शहरात ग्रामीण भागात खासगी क्लासेसचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. त्यातच क्लासेसना जाणार्‍या मुला-मुलींचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे क्लासेसच्या परिसरात टोळक्याने उभे राहणे, आरडा ओरड करणे, अश्लील बोलणे, शिवीगाळ करणे, प्रसंगी हाणामारीचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला बट्टा लागत आहे. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांना खरेच शिक्षण मिळत आहे का, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणाला काळजी आहे का, गळा चिरेपर्यंतच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय संस्थासह खासगी संस्था चालकांनी खबरदारी घेतली आहे का, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज पालकांवर आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×