Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

आंबेगाव पोलिसांनी ३ दुचाकी केल्या जप्त

marathinews24.com

पुणे – मौजमजेसाठी पैसे मिळावेत यासाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटार सायकली जप्त केल्या आहेत. कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अजय मर्याप्पा जावीर (वय २९, रा. हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) असे दुचाकी चोराचे नाव आहे.

पॉलिसीचे पैसे मिळवणे पडले महागात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार सचिन गाडे आणि प्रमोद भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. आंबेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी जांभुळवाडी तलावाजवळ चोरीच्या दुचाकीसह बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि त्यांच्या पथकाने जांभुळवाडी तलाव परिसरात कारवाई करत अजय जावीर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने १४ जूनला शनिनगर चौकातील हरिओम हार्डवेअरसमोरून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

पुढील तपासात आरोपीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही दुचाकी चोरी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीकडून ३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे त्यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×