Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणी

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, रस्ते, आरोग्य व वाहतूक व्यवस्थेची केली पाहणी

marathinews24.com

पुणे – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाची पूर्वपाहणी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बोपोडी मेट्रो स्थानकापासून या पाहणी दौऱ्याला प्रारंभ झाला.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न – सविस्तर बातमी

या पाहणी दौऱ्यात माजी नगरसेवक आनंद छाजेड, नगरसेवक  भक्ती गायकवाड, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर, मलनिःसारण विभागाचे अधीक्षक अभियंता हरीभक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवले पाटील, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी प्रेमलता घाटे, विभागीय आरोग्य अधिकारी पखाले, उपअभियंते दीपक लांडे व डॉ. बढीये, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर व कांबळे, औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, मलनिःसारण व्यवस्था, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधांची सविस्तर पाहणी करण्यात आली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमहापौर वाडेकर यांनी दिल्या.

पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×