कौटुंबिक वादातून महिलेचा खून

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

खराडीतील घटना

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तिचा खून केल्याची घटना खराडी भागात बुधवारी घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती पसार झाला आहे. किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३, रा. भनगाई वस्ती, खराडी) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

केतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा खासगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो. त्याची पत्नी किरण ही खराडी परिसरात घरकामे करते. बाबर दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबर दाम्पत्यात वाद होत होते. बुधवारी (२४ जून) पहाटे चारच्या सुमारास किरण गाढ झोपेत होती. शेजारी मुले झोपली होती. आरोपीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपीने किरणचे नाक आणि कान तीक्ष्ण शस्त्राने कापला. गंभीर जखमी झालेल्या किरणला भाऊ दादू याने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टारांनी सांगितले.
आरोपी पती पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आरोपीने खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र मिळालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×