केतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा

वडील विशाल अगरवाल यांची मागणी

marathinews24.com

पुणे – लोहगडावर घडलेल्या घटनेनंतर आम्ही आमच्या कुटुंबाच्या एकुलत्या एक मुलाला गमावले आहे. आता आमच्या जीवनात दु:खाशिवाय काही राहिले नाही. केतनचा कोणताही दोष नसताना त्याचा जीव घेणाऱ्या मारेकऱ्यावरील खटला सरकारने फास्ट ट्रॅकवर चालवावा. लवकरात लवकर त्यांना फाशी द्यावी, जेणेकरुन केतनच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी केतन अगरवाल याचे वडील विशाल अगरवाल यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद – सविस्तर बातमी

लोहगड येथे केतन अगरवाल याला ढकलून देऊन त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी खून केल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले. घटनेने अगरवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत विशाल अगरवाल यांनी सांगितले की, या घटनेने आम्हाला जीवनभराचे दु:ख दिले आहे. सरकारने हा खटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर घेऊन मारेकर्यांना फाशी द्यावी.

आम्हाला असा दगा देतील वाटले नव्हते

आम्ही गोयल कुटुंबाला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. हे लग्न ठरवण्यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दांम्पत्याला देखील अनेक वर्षांपासून ओळखतो. ते असा दगा देतील, आम्हाला फसवतील असे कधी वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया अगरवाल यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×