Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

एकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्न

रोजगार, निवारा, शिक्षण व सुरक्षेच्या मुद्द्यांवर कार्यशाळेत मंथन

marathinews24.com

पुणे – विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित व इतर एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करत असून, त्याअनुषंगाने “एकल महिला दिवस” निमित्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक), जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, पुणे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

कार्यशाळेस महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अंकिताताई पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) आनंद खंडागळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी दत्तात्रय कुटे तसेच एकल महिला, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक उपस्थित होते.

यावेळी रोजगाराच्या संधी, मालमत्तेचा हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा, नवीन योजनांची गरज, कायदेशीर अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेतील सुधारणा तसेच महिलांची सुरक्षा व सहभाग वाढविण्याबाबत सूचना व अभिप्राय नोंदविण्यात आले. प्राप्त सूचना व अभिप्रायांचा समावेश करून एकल महिला धोरणाचा मसुदा शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×