लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सवात आयुष्मान भारत योजनेबाबत जनजागृती
marathinews24.com
पुणे – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (Ayushman Bharat Card) पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातून सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये विविध उपचारांचा लाभ घेता येतो. आर्थिक अडचणीमुळे आवश्यक उपचारांपासून नागरिक वंचित राहू नयेत, यासाठी केंद्र शासनाच्या या योजनेचा पात्र नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाचे गणेश चव्हाण यांनी केले.
जिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – सविस्तर बातमी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्यामार्फत आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत वाघोली येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या ‘वाघोलीचा राजा’ गणेशोत्सव मंडळासमोर आयुष्मान भारत योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी नागरिकांना योजनेची माहिती दिली.
चव्हाण म्हणाले, Ayushman Bharat Card योजनेचा उद्देश पात्र कुटुंबांना आरोग्यविषयक आर्थिक संरक्षण देणे आणि गंभीर आजारांवरील रुग्णालयीन उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सरकारी तसेच सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये नियमानुसार उपचार घेता येतात. उपलब्ध उपचार व सुविधा रुग्णालय तसेच योजनेच्या नियमांनुसार निश्चित करण्यात येतात.
Ayushman Bharat Card मिळविण्यासाठी योजनेनुसार पात्रता असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक कुटुंबीय माहितीच्या आधारे योजनेतील आपली पात्रता तपासून घ्यावी. पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत रुग्णालयीन उपचारांसाठी आर्थिक संरक्षण मिळते. तसेच अनेक उपचारांसाठी कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध असून, गंभीर आजाराच्या उपचारामुळे कुटुंबावर येणारा आर्थिक भार कमी करण्यास या योजनेची मदत होते. नागरिकांनी योजनेची पात्रता व उपलब्ध उपचारांची अधिकृत माहिती तपासूनच लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव कवडे, उपाध्यक्ष अनिकेत हरगुडे, खजिनदार क्षितिज शिरसागर, मंगेश उबाळे यांच्यासह मंडळाचे सदस्य, नागरिक व महिला उपस्थित होत्या.























