Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार

marathinews24.com

मुंबई – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचे स्वागत करत आभार व्यक्त केले आहेत.

‘यापुढे कोणत्याही पक्ष कार्यलयासमोर आंदोलनास परवानगी नाही- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, दहशतवादी हल्ल्यात कुटुंबप्रमुख गमावलेल्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारा हा दिलासा अत्यंत महत्त्वाचा असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक प्रशासकीय अडचणींवर मात करून हा निर्णय तडीस नेला आहे. अशा संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण भूमिकेमुळे पीडित कुटुंबाला आधार मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून आसावरीच्या शिक्षणाला समकक्ष असे पद निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. शासन विशेष बाब म्हणून सहानुभूतीपूर्वक या नियुक्तीला मंजुरी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×