Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

‘यापुढे कोणत्याही पक्ष कार्यलयासमोर आंदोलनास परवानगी नाही – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलिसांचा मोठा निर्णय

marathinews24.com

पुणे – शहरातील ‘काँग्रेस भवन परिसरात झालेल्या आंदोलनानंतर यापुढील काळात विविध राजकीय पक्षांचे नेत, तसेच पक्ष कार्यालयांसमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध केला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश – सविस्तर बातमी

दगडफेक घटनेत काँग्रेसचे तीन, तसेच भाजपचे दोन असे पाच कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. दोन पोलीस कर्मचारी, दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी फिर्यादी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्या. त्यानुसार भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
‘ काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन शांतपणे पार पडेल, असा अंदाज होता. घाेषणाबाजी केली जाईल, अशी शक्यता होती. आंदोलनस्थळी पोलिसांनी बंदोबस्तही तैनात केला होता. मात्र, कार्यकर्त्यांची झटापट झाली. दगडफेक करण्यत आल्याची घटना घडली. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यापुढील काळात कोणताही पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

जबाबदारी निश्चित करुन कारवाई

काँग्रेस भवन परिसरात भाजपच्या नगरसेविका महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित हाेत्या. त्यांच्याविरुद्ध गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ‘पोलिसांकडे आलेल्या तक्रारीचे अवलोकन केले जाईल. तपासातील माहितीनुसार जबाबदारी निश्चित करुन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल ’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

पोलीस आयुक्तांनी आरोप फेटाळले

पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करुन आरोप केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोप फेटाळून लावले. ‘पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली असून, आराेपांमध्ये तथ्य नाही’, असे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×