गावी जाण्यासाठी एसटीत शिरत असताना दागिन्याची चोरी
marathinews24.com
पुणे– शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्टँड परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पेंडंट चोरून नेले. ही घटना २० एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रंजना शत्रुघन पालखे (वय ३५, रा. बार्शी, सोलापूर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ट्रेडींग स्टॉकची गुंतवणूक पडली १५ लाखांना..सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रंजना पालखे बार्शीमध्ये राहायला असून, कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. २० एप्रिलला रात्री साडेनउच्या सुमारास त्या स्वारगेट एसटी स्थानकातून बार्शीकडे जाणार्या बसमध्ये शिरत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गंठणातील सोन्याचे पेंडंट चोरले. काही वेळानंतर महिलेचा चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर रंजनाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांनी केली आहे.