Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

दुचाकीस्वार तरूणाला दमदाटी, ५० हजारांची सोन्याची चैन हिसकावली

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार तरूणाचा पाठलाग करीत तिघाजणांनी त्याला अडवून, तु आमच्या अंगावर का थुंकला असे विचारत दमदाटी केली. त्यानंतर त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी तीन जणांविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. शिवम दत्ता आवचर (वय १८, रा. कामठे कॉलनी, नर्‍हे) याला अटक केली आहे. रोहन संजय रणपिसे (वय २७, रा. धायरी फाटा, सिंहगड रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

चारचाकी वाहनासाठी ‘एमएच ४२ बीएस’ क्रमांकाची नवीन मालिका – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणपिसे हे शनिवारी (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवेलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरून घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर तिघेजण आले. त्यांनी रोहनला थांबवत तु आमच्या अंगावर का थुंकला असे विचारत दमदाटी केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत रणपिसे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची चैन तिघांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी शिवम आवचर याला अटक केली असून, उर्वरीत दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×