Breking News
पीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीलापुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविलेPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरलाGender Equality Maharashtra : लिंग समानतेसाठी कालबद्ध कृती आराखडा राबवाLuxury Bus RTO Action : परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बसविरुद्ध पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष तपासणी मोहीमNanded Pistol Arrest : पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक, युनीट तीनची कामगिरीPune Drought Management : जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाNaval Kishore Ram Birthday : आयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कारगणेशोत्सवात विज्ञानाचा जागर; शिवाजी मंदिर मंडळाच्या चंद्रयान व तारांगण शोला उत्स्फूर्त प्रतिसादPune MLC Election 2026 : पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

चारचाकी वाहनासाठी ‘एमएच ४२ बीएस’ क्रमांकाची नवीन मालिका

नवीन वाहनांसाठी ‘MH ४२ BS’ क्रमांकाची मालिका सुरू

marathinews24.com

बारामती – खाजगी संवर्गातील चारचाकी वाहनांसाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ‘एमएच ४२ बीएस’ क्रमांकाची नवीन मालिका सुरु करण्यात येणार असून आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या खाजगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी ७ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेच्यादरम्यान धनाकर्षासह (डी.डी.) विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी ७ मे रोजी सायं ५ वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल.

यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल त्यांनी ८ मे रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा धनाकर्ष भरलेल्या व्यक्तीस नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र तसेच पॅनकार्डची स्वाक्षांकित प्रत आणि ‘डीवाय. आर.टी.ओ., बारामती’या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा बारामती येथील धनाकर्ष असावा. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यानी कळविले आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×