Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

बारामतीतील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीना अटक करा, डॉ. नीलम गोऱ्हे

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे – बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडाछेड केल्याच्या घटनेतील आरोपींवर पॉस्को आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.

पुण्यात ९ वर्षाच्या दोन मुलीसोबत अश्लील चाळे – सविस्तर बातमी 

बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना 13 एप्रिल रोजी घडली. त्यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांकडे याबाबतची तक्रार देताच, आरोपी विरोधात विविध कलम लावून पॉस्को आणि एट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला.पण त्या आरोपींना अटक करण्यात आली नाही. यामुळे पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्ती केली आहे. पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार आणि सध्या गावातील वातावरण, याबाबत पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी मला सविस्तर माहिती दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी तात्काळ ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन केला. घटनेतील सध्याची माहिती जाणून घेत पोलीस तपास पथकाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पीडित मुलीच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन केले पाहिजे,असे निर्देश त्यांनी दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×