पुण्यात पत्रकार भवनाजवळील घटना
marathinews24.com
पुणे – स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने तिच्याकडील १० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला आहे. ही घटना २४ एप्रिलला सकाळी सव्वा सहाच्या सुमारास मध्यवर्ती शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौक ते पत्रकार भवनदरम्यान नवी पेठेत घडली आहे. याप्रकरणी अवनी गुरूदास सावंत (वय २४ रा. सदाशिव पेठ) हिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
एटीएम मशीनमध्ये करीत होते फेरफार, मशीनमध्ये बसविले फ्लॅप – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार अवनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असून, सदाशिव पेठेत राहायला आहे. २४ एप्रिलला नेहमीप्रमाणे अवनी व्यायाम करण्यासाठी गांजवे चौक ते पत्रकार भवनदरम्यान चालत निघाली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने तिचा पाठलाग केला. आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने अवनीजवळ येउन तिचा मोबाइल हिसकावला. तिने आरडाओरड करेपर्यंत चोरटा सुसाट पसार झाल आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शेडजाळे तपास करीत आहेत.
भरदिवसा लुटमारीच्या घटनांनी महिलांमध्ये धास्ती
शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला असून, भरदिवसा महिलांचा पाठलाग करून लुट केली जात आहे. दोनच दिवसांपुर्वी जंगली महाराज रस्ता परिसरात एकाला लुटल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा चोरट्याने विद्यार्थिनीचा मोबाइल हिसकावून नेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पादचारी महिला, मुलींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी दुचाकीस्वार चोरट्यांचा माग काढून अटक करण्याची मागणी केली जात आहे.