Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावापुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदीपुणे जिल्ह्यात अवैध दारूमाफियांवर धडक कारवाईपेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारकभरधाव वाहनाच्या धडके १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, चालक फरारपरताव्याचे आमिष; १२ कोटी रुपयांना गंडाकारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची घेतली लाचअल्पवयीन मुलाकडून वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडगुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

शतपावली करणार्‍या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस कायम

marathinews24.com

पुणे – शतपावली करणार्‍या दोन महिलांचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दरम्यान चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या दुसर्‍या महिलेला धक्का देउन दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. ही घटना ५ मे रोजी रात्री साडेनउच्या सुमारास हडपसरमधील शेवाळेवाडी समृद्धी बंगल्याजवळ घडली आहे. याप्रकरणी १२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली गजानन हरपळे (वय ४५ रा. शेवाळेवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात महिलांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वैशाली हरपळे आणि त्यांची मैत्रीण मनीषा शेवाळे ५ मे रोजी जेवण केल्यानंतर घराजवळ शतपावली करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने वैशालीच्या गळ्यातील ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यावेळी मनीषाने चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी तिला धक्का देउन दुचाकीवरून सुसाट पलायन केले. याप्रकरणी तक्रारदार हरपळे घाबरल्या असल्यामुळे त्यांनी उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.

एकाच दिवसात ३ सोनसाखळी चोरीला

दुचाकीस्वार चोरट्यांनी ११ मे रोजी एकाच दिवसात तीन ठिकाणी महिलांना लक्ष्य करीत त्यांचे दागिने हिसकावून नेले. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलांसह पादचारी महिलांना लक्ष्य करीत दागिने हिसकावले. कोथरूड, अलंकार, चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांचे दागिने हिसकाविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांच्या कामगिरीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×