Breking News
डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण

पीएमपीएल बसप्रवासात महिलांचे दागिने चोरीला

पुण्यातील पीएमपीएल बसप्रवास नको गं बाई, महिलांचे दागिने चोरणारी टोळी सुसाट...

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मारला डल्ला

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनेत महिलांचे २ लाख २० हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. या घटना १२ मे रोजी दुपारच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन परिसर प्रवासासह पंचमी चौक ते पर्वती प्रवासादरम्यान घडल्या आहेत. याप्रकरणी बंडगार्डन आणि पर्वती पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

सदाशिव पेठेतील मेडीकलमध्ये चोरट्यांचा डल्ला; ६४ हजारांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला येरवड्यातील रहिवाशी असून, १२ मे रोजी पुणे स्टेशन परिसरातून हिंजवडीला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी बसमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील १ लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने, मोबाइल असा ऐवज चोरून नेला. काही वेळानंतर महिलेला दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत तक्रारदार जेष्ठ महिला पंचमी चौक ते गजानन महाराज मठ चौक लक्ष्मीनगर पर्वती असा प्रवास करीत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या हातातील ७० हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली. काही वेळानंतर महिलेला सोन्याची बांगडी चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर जेष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कोपनर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×