Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.अनिकेत सूर्यकांत पिठे (वय २८, रा. महात्मा गांधी रस्ता, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत सूर्यकांत पिठे (वय ५७) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतीला पाणी देण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनिकेत हा २२ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाला होता. कुंजीरवाडी परिसरात भरधाव वाहनाने दुचाकीस्वार अनिकेतला धडक दिली. अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×