Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

चेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघड

खून केल्यानंतर पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी शक्कल

marathinews24.com

पुणे – व्यावसायिक केतन अगरवाल याचा खून करण्यासाठी सिया आणि चेतन यांनी कट रचला होता. थंड डोक्याने दोघांनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. लोहगडावर केतनचा खून करण्यासाठी चेतन हा आधीच पोहोचला. लोहगडावर पर्यटकांकडून शुल्क आकारला जाते. मात्र, चेतनने हे शुल्क भरले नव्हते. व्यायाम करुन परत आल्यानंतर शुल्क भरतो, असे तेथील सुरक्षा रक्षकांना सांगितले होते. पोलिसांच्या नजरेतून वाचविण्यासाठीी त्याने शुल्क चुकविल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्री – सविस्तर बातमी 

‘केतन अगरवाल याला होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चैाधरी यांनी १८ जून रोजी लोहगड किल्लावरुन दरीत ढकलून दिले. केतनच्या मृत्यू प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पाेलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन खून प्रकरणाचा छडा लावला. केतनचा खून करण्यासाठी दोघांनी कट रचला होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दोघांनी काळजी घेतली होती. चेतनने त्याचा मोबाइल दुकानात ठेवला होता. मोबाइलची इंटरनेट सुविधा बंद करुन ठेवली होती. दुकानातील कामगाराचा मोबाइल संच घेऊन तो लोहगडावर आला होता. त्याने ओळख न पटण्यासाठी चेहरा मुखपट्टीने (मास्क) झाकला होता. त्याने ‘हुडी’ परिधान केली होती. त्याने पाठीला सॅक लावली होती. गिर्यारोहणासाठी लाेहगडावर आल्याचे त्याने भासविले होते. केतनचा खून करण्यापूर्वी तो लोहगडावर पोहोचला होता’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

लोहगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून पायथ्याला २५ रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येते. चेतनने हे शुल्क भरले नाही. व्यायामावरुन परत आल्यानंतर शुल्क भरतो, असे पायथ्यशी असलेल्या सुरक्षारक्षकांना सांगितले होते. १८ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास केतन आणि सिया हे मोटारीने लोहगडावर निघाले. याबाबतची माहिती चेतनला होती. सिया आणि केतन तेथे पोहोचण्यापूर्वी चेतन लोहगडावर पोहोचला होता. पायथ्याला असलेल्या पायरीवर तो बसला होता. दोघे जण गडावर गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ चेतन गेला. त्यानंतर सिया आणि चेतनने केतनला लोहगडावरुन दरीत ढकलून दिले, अशी माहिती तपासात मिळाली आहे.

सियाचा आरडाओरडा, रडण्याचा बनाव

केतनला दरीत ढकलून देताना तेथे कोणी नव्हते. मात्र, केतन कड्यावरुन तोल जाऊन पडल्याचे सांगण्यासाटी सियाने आरडाओरडा केला. तिने रडण्याचा बनाव केला. केतनची आई पूजा यांच्याशी सियाने संपर्क साधला आणि तो कड्यावरुन दरीत पडल्याचे सांगितले. अगरवाल कुटुंबीय गडावर पोहोचले. पोलीस आणिि स्थानिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील केतनला खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×