Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यू

कौटुंबिक छळ अन जादूटोण्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

टँकर चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

लाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकी – सविस्तर बातमी

बाबूलाल रामाजी चौधरी (वय ४८, रा. आई माता निवास, गोकुळ पार्क, लाेणीकंद, अहिल्यानगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौधरी यांचे नातेवाईक मुकेश समाराम चाैधरी (वय ३७, रा. पासलकर लाॅनशेजारी, वाडेबोल्हाई रस्ता, लोणीकंद) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बाबुलाल चौधरी हे मंगळवारी (२४ जून) दुपारी साडेचारच्या सुमारास केसनंद-वाघोली रस्त्याने निघाले होते. त्या वेळी पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीच्या चाकाखाली सापडून चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक हवाले तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी हडपसरमधील सय्यदनगर रेल्वे भुयारी मार्गाजवळ पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मृत्यू होण्याच्य घटना वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिसंनी टँकर मालक, चालकांची कोंढवा पोलीस ठाण्यात बैठक घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. टँकर चालकांकडून अपघात घडल्यास थेंट मालकांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सोलापूर रस्त्यावर पादचारी तरुणाचा मृत्यू

पादचारी तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात नुकतीच घडली. नागेश राहुल निकम (वय १८) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाल्मिक भारत जाधव (वय ३५, रा. गुजरवस्ती, कवडीपाट, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश निकम हा १८ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास लोणी काळभोर भागातून निघाला होता. पुणे-सोलापूर रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. उपचारांदरम्यान निकम याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×